विज्ञान केंद्र - उपक्रम


मुख्यपान     मुक्त प्रकल्प     लेखमाला     उपक्रम     संपर्क    


त्रिपिटक

या वर्षीपासून (2021) त्रिपिटक हा उपक्रम नव्याने चालू करीत आहोत. पुस्तक पेटी, प्रयोग पेटी आणि प्रथमोपचार पेटी अशा तीन पेट्यांचे संच विज्ञान केंद्रातर्फे उपलब्ध करून दिले जातील. ज्या व्यक्ती वा संस्था या विषयावरील शिबिरे आयोजित करतील, त्यांना हे संच अल्प डिपॉझिट ठेवून वापरता येईल.

शिबिरांबद्दल अधिक माहिती

या तीन पेट्या वापरून कोणती शिबिरे, कशी घेतली जातील याचा थोडक्यात आराखडा खाली दिला आहे.

पुस्तक पेटी शिबीर

अधिक माहिती पुढील प्रमाणेः

 1. वाचन शिबीर एक दिवसाचे असेल.
 2. पुस्तक पेटीत मुख्यतः विज्ञान विषयक पुस्तके आहेत. ही पुस्तके शिबिरार्थींना वाचायला देऊन, वाचलेल्या पुस्तकातील विषया संबंधी प्रश्न विचारण्यास शिबिरीत प्रोत्साहन दिले जाईल.
 3. आयोजकांनी मागणी केल्यास विज्ञान केंद्रातर्फे एक विज्ञानदूत शिबिरार्थींच्या मार्गदर्शनासाटी येईल. त्या साठी या प्रशिक्षकाला थोडे मानधन देणे अपेक्षित आहे.
 4. शिबिरातील प्रशिक्षणाची भाषा मुख्यतः मराठी असेल. मात्र तशी गरज भासल्यास, इंग्रजी परिभाषेची अडचण येऊ दिली जाणार नाही.

प्रयोग पेटी शिबीर

प्रयोग पेटी बाबतची अधिक माहितीः

 1. प्रयोग पेटीत ६ प्रयोगांचे साहित्य आहे. त्या शिवाय हे सहा प्रयोग कसे करायचे या बद्दल मार्गदर्शन करणारी पुस्तिका देखील आहे.
 2. शिबिरार्थींकडून व्यक्तिगत रित्या किमान दोन प्रयोग करून घेतले जातील.
 3. प्रयोग केल्यावर त्याची निरीक्षणे नोंदवली जातील. त्यावरून निष्कर्ष कसे काढायचे याची पद्धत समजावून दिली जाईल.
 4. शिबिरातील प्रशिक्षणाची भाषा मुख्यतः मराठी असेल. मात्र तशी गरज भासल्यास, इंग्रजी परिभाषेची अडचण येऊ दिली जाणार नाही.

प्रथमोपचार पेटी शिबीर

प्रथमोपचार पेटी बाबत अधिक माहितीः

 1. बँडेज, चिकटपट्टी, डॉक्टरांच्या चिठ्ठीची गरज नसलेली काही औषधे असे आरोग्य विषयक साहित्य या पेटीत आहे.
 2. वरील साहित्य कधी व कसे वापरायचे याचे मार्गदर्शन करणारे पुस्तक या पेटीत आहे.
 3. प्रथमोपचार कसे करायचे याची काही प्रात्यक्षिके शिबिरार्थींकडून करून घेतली जातील.
 4. शिबिरातील प्रशिक्षणाची भाषा मुख्यतः मराठी असेल. मात्र तशी गरज भासल्यास, इंग्रजी परिभाषेची अडचण येऊ दिली जाणार नाही.

आवाहन

 • या पेट्या वापरून विविध व्यक्तींनी व संस्थांनी ही शिबिरे आयोजित करावीत.
 • त्यासाठी किमान ५ मुले व ५ मुली शिबिरात असणे आवश्यक आहे.
 • या मुलांचा वयोगट १२ वर्षे वा जास्त असा असल्यास अधिक सोयीचे जाईल.

विज्ञान केंद्रातर्फे या शिबिरासाठी प्रशिक्षक उपलब्ध होऊ शकतात. आयोजकांनी प्रशिक्षकाला योग्य ते मानधन द्यावे अशी अपेक्षा आहे. तुम्हाला असे शिबिर आयोजित करायचे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.


Author: विज्ञानदूत

Created: 2021-02-10 Wed 19:30