विज्ञानदूत

काही वर्षांपूर्वी विज्ञानदूत हे मासिक आम्ही चालवत होतो. (जुने अंक डाउनलोड इथे करू शकता) ते कागदावर छापून वितरित होत होते. विज्ञानदूत नव्या इ-रुपात आता पुन्हा एकदा सर्वांना उपलब्ध होईल.

  • नव्या रूपातील विज्ञानदूत सर्वांना A4 आकारात छापता येईल. ही आठ पाने छापण्याचा खर्च साधारण ८ रुपये असेल.
  • pdf रुपातील अंक संगणकावर वाचण्यासाठी सर्वांना निःशुल्क उपलब्ध आहेच.
  • हा अंक छापून शाळेत किंवा महाविद्यालयात नोटिस बोर्डावर लावता येईल. त्यामुळे अनेक विद्यार्थी एकाच वेळी तो वाचू शकतील.
  • हा अंक (Creative Commons 0) या मुक्त परवान्याखाली प्रकाशित केला आहे. त्यामुळे कोणीही तो सर्व अंक छापून वितरित करू शकतो किंवा विकूही शकतो. (एखादे पान किंवा त्याचा भाग स्वतंत्रपणे छापू नये.) मात्र त्यात कोणताही बदल करण्याची परवानगी नाही. त्यासाठी विज्ञान केंद्राला कोणीही काही आर्थिक देणे लागत नाही.
  • या संकेतस्थळाच्या विविध वाचकांनी हा अंक छापून मित्रमंडळी, नातेवाईक, शाळा व महाविद्यालये यांत वितरित करावा ही विनंती करीत आहोत.
  • तुम्हाला हा अंक कसा वाटतो ते आम्हाला जरूर कळवा.
  • जून २०१९ चा विज्ञानदूतचा अंक येथे डाउनलोड करता येईल.