हास्यकेंद्र ३

भरलेला पेला

भरलेला पेलाआशावादीः हा पेला अर्धा भरला आहे.
निराशावादीः हा पेला अर्धा रिकामा आहे.
शास्त्रज्ञः हा पेला पूर्ण भरलेला आहे. त्यातल्या वरच्या अर्ध्या भागात हवा भरली आहे, आणि खालच्या अर्ध्या भागात पाणी भरले आहे.

 

दुकान आलं की घेईन

चिंगीः आज आम्हाला असं शिकवलं की सूर्याभोवती फिरताना पृथ्वी स्वतः भोवती फिरते. पृथ्वीवरच्या सगळ्या गोष्टी तिच्या बरोबर फिरतात.
आईः चिंगे, पुरे झाला आता तुझा अभ्यास. कोपऱ्यावरच्या दुकानातून साखर घेऊन ये.
चिंगीः थांब दारातच उभी राहते. पृथ्वी फिरताना दुकान समोर आलं की इथूनच लगेच साखर घेता येईल.

 

तज्ञ पाहून घेतील

हा प्रसंग काही लाख वर्षांपूर्वी घडला. भीमसरट (डायनोसॉर) आई आणि भीमसरट पिल्लू यांच्यातला हा संवादः

पिल्लू भीमसरटः (घाबरून) आई, आईआपली प्रजाति नष्ट होणार असं मी ऐकलं. ते खरं का ?

आई भीमसरटः तू काही काळजी करू नकोस बाळा, या प्रश्नाचं सारं काही तज्ञ पाहून घेतील.