घरच्या घरी द्रवरूप खत

सध्या बाजारात झाडांना पांढरी मुळे फुटण्यासाठी ह्युमिक आम्ल हे संजीवक ४०० ते ५०० रुपये लिटरप्रमाणे विकले जाते. वरील औषध आपल्याला घरी अगदी नाममात्र किंमतीत, ३० ते ४० रुपयात, तयार करता येते. याची पद्धती अगदी सोपी आहे.

एका बादलीत पाऊण बादली पाणी भरावे. त्यात रोज हिरव्या पालेभाजीतील टाकाऊ भाग, उदा. कोथिंबीर अथवा पालकाच्या काड्या, कोबी किंवा मुळ्याची पाने, किंवा कुठल्याही झाडाचा कोवळा पाला (tender shoots) टाकत रहावे. ८ ते १० दिवसांनी त्यात १०० मि.लि. गोमुत्र मिसळावे. बादली या कोवळ्या हिरव्या कचऱ्याने गच्च भरावी. साधारण २५ ते ३० दिवसांनी या मिश्रणाला कॉफीसारखा रंग येईल. नंतर हे मिश्रण गाळून घ्यावे. हे मिश्रण १ : ५ या प्रमाणात पाणी घालून झाडांसाठी वापरता येईल.

देशी गायीचे गोमुत्र उपलब्ध झाल्यास १० किंवा २० मि.लि. / १ लिटर पाणी असे मिश्रण करून फवारावे.

वरील दोन्ही पद्धतींपैकी योग्य व सुलभ वाटेल ती वापरावी, म्हणजे झाडे सशक्त होतील.

डॉ. अविनाश दांडेकर, तळेगाव