विज्ञान गीत

काही काळा पूर्वी विज्ञानदूत यांचे विज्ञान गीत प्रसिद्ध झाले आहे. आता ते ध्वनिमुद्रित रूपात सर्वांना ऐकण्यासाठी उपलब्ध आहे.

आमचे आम्ही

विज्ञान केंद्राने प्रकाशित केलेले हे ध्वनिमुद्रित गीत तुम्ही वर ऐकू शकता.

प्रयोग करुनी प्रश्न विचारू आमचे आम्ही
प्रश्न विचारू उत्तर शोधू आमचे आम्ही. ||धृ||

ते रहस्य अणुरेणूंचे
ते गूढ गणित संख्यांचे
ते गुपीत जिवा शिवाचे
अन असीम अवकाशाचे

उजेडामधे विज्ञानाच्या शोधू आम्ही
प्रश्न विचारू उत्तर शोधू आमचे आम्ही ||||

सोडू स्पर्धा दुराभिमान
घेऊ सहकार्याचे वाण
निसर्गाचे ठेवू भान
हाती घेता तंत्रज्ञान

सारी पृथ्वी शुद्ध राखुनी सजवू आम्ही
प्रश्न विचारू उत्तर शोधू आमचे आम्ही ||||

विज्ञानदूत

गीतकारः – विज्ञानदूत
संगीतकारः – श्री. विनायक लिमये
गायकः – साक्षी हेंद्रे, विराज सवाई

वरील गाणे सर्वांच्या वापरासाठी उपलब्ध आहे. हे गीत CC0 (Creative Commons License) अंतर्गत खुले केले आहे.