उपक्रम

विज्ञान केंद्रातर्फे विविध उपक्रम केले जातात. सध्या चालू असणाऱ्या उपक्रमांची माहिती येथे दिली आहे.

स्वतःच स्वतःचे संकेतस्थळ (वेबसाइट) बनवा

दि. २४ मार्च २०१९ रोज सकाळी ९-३० ते १३-३० या कालावधीत विज्ञान केंद्रातर्फे स्वतःचे संकेतस्थळ (वेबसाइट) बनवण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले.

  • या कार्यशाळेत एकूण ५ जण सहभागी झाले व त्यांनी स्वतःची वेबसाइट तयार केली.
  • वेबसाइट बनवण्यासाठी कोणताही खर्च आला नाही.
  • वर्डप्रेस या मुक्त प्रणालीचा वापर करून wordpress.com च्या सर्व्हरवर ही संकेतस्थळे निर्माण करण्यात आली.
  • मार्गदर्शन निःशुल्क होते.

गणित साक्षरता उपक्रम

सर्वसामान्य लोकांना गणिताची वाटणारी भीती घालवण्यासाठी विज्ञान केंद्रातर्फे याच संकेतस्थळावर एक व्याख्यानमाला सुरू होते आहे. त्या व्याख्यानांविषयीची ही प्रस्तावनाः

संगणकावर मराठी टंकलेखन प्रशिक्षण

    • संगणक प्रणाली – लिनक्स
    • लेखन प्रणाली – लिबर ऑफिस
    • अक्षरवळण – युनिकोड
    • वेळ सायं. ४-३० ते ५-१५, ५-३० ते ६-१५, विज्ञान केंद्र तळेगाव येथे
    • तुमच्या घरातील संगणकावर (निःशुल्क) लिनक्स बसवून त्यावर मराठी टंकलेखनाची सोय स्थापित केली जाईल. त्यासाठी संगणक विज्ञान केंद्र येथे आणावा लागेल
    • प्रशिक्षण घ्यायचे असल्यास संपर्क साधून नाव नोंदणी करणे आवश्यक

लोक-विज्ञान वाचनालय

    • विज्ञान संबंधित दोन (जुनी किंवा नवी) पुस्तके देणगीदाखल दिली की या वाचनालयाचे सदस्य होता येते.
    • काही (संदर्भ) पुस्तके विज्ञान केंद्रातच वाचण्यासाठी उपलब्ध होतात.
    • अनेक पुस्तके एका वेळी एक या पद्धतीने सदस्यांस घरी नेऊन वाचता येतात.
    • वाचक व्हायचे असल्यास संपर्क साधून नाव नोंदणी करणे आवश्यक

ऑडिओ एडिटिंग प्रशिक्षण

    • संगणकावर आवाजाचे रेकॉर्डिंग करणे, व बदल दुरुस्ती करणे
    • संगणक प्रणाली – लिनक्स
    • एडिटिंग प्रणाली – ऑडॅसिटी
    • एकूण प्रशिक्षण कालावधी – एक महिना
    • प्रशिक्षण निःशुल्क
    • प्रशिक्षण घ्यायचे असल्यास संपर्क साधून नाव नोंदणी करणे आवश्यक

सोलर पॅनेल वर चार्ज होणारा एल्. इ. डी. दिवा बनवणे

    • प्रशिक्षण निःशुल्क
    • साहित्य खर्च ज्याचा त्याने करायचा आहे.
    • प्रशिक्षण घ्यायचे असल्यास संपर्क साधून नाव नोंदणी करणे आवश्यक