पृथ्वी, जंगल, झाड आणि मानव

पृथ्वीवरील एकूण जंगलांपैकी आत्तापर्यंत मानवाने निम्मी नष्ट केली आहेत, असा अंदाज आहे. तरीही अजून माणशी 400 झाडे शिल्लक आहेत. झाडतोडीमुळे आणि जंगलांना आगी लावल्यामुळे हवामानबदलाचा वेग वाढतो. तापमानाच्या नोंदी करायला सुरुवात झाल्यापासूनचा काळ विचारात घेतला, तर गेली चार वर्षे सर्वात उष्ण होती. आर्कटिक मधील हिवाळ्यातले तापमान 1990 च्या तुलनेत 3 डिग्री सेल्सियसने वाढले आहे. वाचन सुरू ठेवा “पृथ्वी, जंगल, झाड आणि मानव”

द टर्मिनेटर

https://commons.wikimedia.org/wiki/File:Artificial_intelligence_(33661764490).jpg
कृत्रिम बुद्धिमत्ता

आइझॅक आसिमोवच्या गोष्टी मी खूप आवडीने वाचल्या आणि वाचते. मुख्यत: रोबोच्या गोष्टी, ज्या विसाव्या शतकात लिहिल्या गेल्या, पण सुमारे तीन शतकांनंतर घडतात. माणसांच्या दृष्टीने धोक्याची किंवा कंटाळवाणी कामे रोबोकरवी करून घ्यायची, ही मूळ कल्पना. तीन नियमांनी बांधलेले रोबो माणसाला कुठल्याही प्रकारे हानी होऊ देणार नाही, हे गृहीत. वाचन सुरू ठेवा “द टर्मिनेटर”