हास्यकेंद्र ३

भरलेला पेला

भरलेला पेलाआशावादीः हा पेला अर्धा भरला आहे.
निराशावादीः हा पेला अर्धा रिकामा आहे.
शास्त्रज्ञः हा पेला पूर्ण भरलेला आहे. त्यातल्या वरच्या अर्ध्या भागात हवा भरली आहे, आणि खालच्या अर्ध्या भागात पाणी भरले आहे. वाचन सुरू ठेवा “हास्यकेंद्र ३”

स्नेह पर्यावरणाशीः गतिमान संतुलन

महाराष्ट्रातील नामवंत पर्यावरण कार्यकर्ते श्री. दिलीप कुलकर्णी यांनी त्यांचे मासिक विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर pdf रूपात थेट डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. वाचन सुरू ठेवा “स्नेह पर्यावरणाशीः गतिमान संतुलन”

जुलै २०१९ चा विज्ञानदूत

या महिन्याचा विज्ञानदूतचा अंक ठरल्याप्रमाणे १५ जुलैला प्रसिद्ध होत आहे. या अंकातः वाचन सुरू ठेवा “जुलै २०१९ चा विज्ञानदूत”

सौर विद्युत कार्यशाळा

विज्ञान केंद्राच्या वतीने दि. २६,२७ व २८ रोजी “सौर विद्युत” या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. १० व्यक्तींनी या कार्यशाळेत भाग घेतला. श्री. प्रसाद मेहेंदळे व श्री. अभिजीत सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले.

वाचन सुरू ठेवा “सौर विद्युत कार्यशाळा”

विज्ञानदूत

काही वर्षांपूर्वी विज्ञानदूत हे मासिक आम्ही चालवत होतो. (जुने अंक डाउनलोड इथे करू शकता) ते कागदावर छापून वितरित होत होते. विज्ञानदूत नव्या इ-रुपात आता पुन्हा एकदा सर्वांना उपलब्ध होईल. वाचन सुरू ठेवा “विज्ञानदूत”

कोकणचा सडा : एक नैसर्गिक वारसा

डॉ.अपर्णा वाटवे या गेली काही वर्षे पर्यावरण या क्षेत्रात काम करीत आहेत. त्यांचा सध्याचा प्रकल्प कोकणवासियांच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. त्या प्रकल्पाबद्दल त्यांच्याच शब्दात वाचा….
वाचन सुरू ठेवा “कोकणचा सडा : एक नैसर्गिक वारसा”

ओला कचरा- समस्या आणि उत्तर

डॉ.संजीव कुलकर्णी हे सूक्ष्मजीवशास्त्र आणि व्यवस्थापनशास्त्राचे तज्ञ आहेत. त्यांचा हा लेख वाचकांना नुसता माहितीपरच नव्हे तर बोधप्रद ठरावा. या विषयावर वाचकांपैकी कोणी गंभीरपणे कृती केली असेल तर विज्ञान केंद्राशी जरूर संपर्क साधा.

 

वाचन सुरू ठेवा “ओला कचरा- समस्या आणि उत्तर”

जीवामृताचे प्रयोग

प्रा.ड़ॉ. अविनाश दांडेकर महाराष्ट्रातील एका कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत. त्यांनी केलेल्या जीवामृतासंबंधीच्या प्रयोगाची माहिती त्यांनी  विज्ञान केंद्रासाठी पाठवली आहे. घर तेथे भाजीबाग या विज्ञान केंद्राच्या प्रकल्पासाठी ही माहिती उपयुक्त आहे. त्यातील गायीचे शेण व मूत्र या ऐवजी जैव वायु संयंत्रातून बाहेर येणारी स्लरी देखील वापरता येऊ शकते. डॉ. दांडेकर यांनी स्वतःच प्रयोग करून तसा अनुभव घेतला आहे. वाचन सुरू ठेवा “जीवामृताचे प्रयोग”

थ्री फेज विद्युत

काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात मायक्रोकंट्रोलर या विषयावर मी या विषयाची ओळख करून देणारे भाषण केले होते. संस्थेच्या सचिवांना मी मराठीत बोलू का इंग्रजीत असे विचारल्यावर “हे विचारून तुम्हीच माझा प्रश्न सोडवला आहे” असे ते म्हणाले. ग्रामीण भागातल्या अनेक विद्यार्थ्यांना (त्यांच्या अनेक शिक्षकांना सुद्धा) मराठीत विषय समजून घेणे सोयीचे जाते असा माझा अनुभव त्यांना मी सांगितला आणि मराठीत बोलण्याचा माझा विचार मी बोलून दाखवला. वाचन सुरू ठेवा “थ्री फेज विद्युत”